बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा अनेक दिवसापासून सुरु आहे. पक्षातील काही नेते वारंवार नेतृत्व बदलाची मागणी करत आहेत. पण पक्ष हाय कमांड मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अलीकडेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे. तसेच दिल्ली दौऱ्यावेळी येडियुराप्पा यांना माध्यमांनी राजीनामा देणार का? असे विचारले असता आपण राजीनामा देणार नसल्याचे म्हंटले होते. आता या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा २५ जुलै रोजी सर्व पक्षाच्या आमदारांना जेवणाची मेजवानी देणार आहेत. कारण त्यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी रविवारी २५ जुलै रोजी शहरातील हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी आमदारांना आमंत्रित केले. ते म्हणाले की आतापर्यंत कोणत्याही विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली नाही. अशी बातमी होती की २६ जुलै रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात येणार आहे.