करमाळा / तरुण भारत संवाद प्रतिनिधी :
मराठा समाजाचा संयम सुटत असून आता इथून पुढील काळात मुख्यमंत्री, मंत्री यांच्या गाड्या मराठा समाजाची पोरं अडवून मंत्र्यांची नाकेबंदी करतील असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला. करमाळा येथे आयोजित मराठा आरक्षण परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सोलापूर येथे आयोजित मोर्चासाठी लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर मराठा समाजाचे नेते विलासराव घुमरे, सचिन काळे, गणेश चिवटे, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे.
आता मराठा समाजाचे आंदोलन इथून पुढे उग्र स्वरूपाचे असणार असून शांततेने आंदोलन करण्याचा मार्ग आता बंद झाला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशीही आम्ही जाऊन भेटणार असून आम्हाला कोणीही द्या फक्त आरक्षण द्या अशी भूमिका मराठा समाजाचे आहे मराठा आरक्षणाचे राजकारण करून सत्तेची खुर्ची मिळवायची हे राजकारण आता बंद झाले पाहिजे, केवळ न्यायालयात योग्य पद्धतीने बाजूं न मांडल्यामुळे मराठा समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
आज अनेक मराठा समाजाची तरुण पूर्ण आत्महत्या करत आहेत या घटना ऐकून आणि वाचून तळपायाची आग मस्तकात जात आहे. आता नाही तर कधीच नाही ही भूमिका घेऊन मराठा समाजाची पोर आता रस्त्यावर उतरणार असून आमच्या तलवारीला गंज लागला आहे. या भ्रमात कुणी राहू नये छत्रपती संभाजीराजे यांचे संयमाने आंदोलन चालू आहे तर आमचे दुसऱ्या बाजूने उग्र स्वरुपाचे आंदोलन सुरू आहे. दोघांची मागणी एक आहे ज्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात शांततेच्या मार्गाने लढा महात्मा गांधींनी उभा केला तर दुसऱ्या बाजूने सुभाष चंद्र बोस यांनी बंदुकीच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला आता त्याच पद्धतीने मराठा समाज सुद्धा शांतता व उग्र अशा दोन्ही बाजूने आता आंदोलन करणार असल्याचे सांगितले.









