बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल आणि जीएसटी संकलनात घट होत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्माई यांनी गुरुवारी केंद्राने जीएसटी भरपाईची मुदत २०२२ च्या पलीकडे आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्याची मागणी केली. दरम्यान दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन चर्चा केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बोम्माई म्हणाले की, त्यांनी कर्नाटकला हप्त्यांमध्ये अदा करायच्या ११ हजार कोटी रुपयांच्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) च्या देयकावरही चर्चा केली.
“जुलै २०२२ पासून देय असलेली थकबाकी या वर्षापासून हप्त्याद्वारे दिली जात आहे. यासोबतच मी २०२२ च्या पलीकडे असलेल्या जीएसटी भरपाई देण्याबाबत चर्चा केली,” असे त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सीतारमण यांना माहिती दिली की कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य जीएसटी संकलन अद्याप स्थिर झाले नाही आणि राज्यांना जीएसटी भरपाई आणखी तीन वर्षांसाठी वाढवल्यास हे चालू महसूल संकटात अधिक उपयुक्त ठरेल, असे म्हंटले. (पीटीआय)