बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री बोम्माई हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत
अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राज्याला नवीन उंचीवर नेण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या टीमला माझ्या शुभेच्छा.”
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा राष्ट्रीय राजधानीला पहिला दौरा आहे. संध्याकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.









