मुंबई/प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत आणि संयमी असले तरी ते त्यांच्या कामातून किती आक्रमक आहेत हे अनेक वेळेला दिसून आलं आहे. आता तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल ३०० अधिकाऱ्यांची फेरबदली करत सर्वांना झटका दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचं कौतुक होत आहे. सचिवांनाही न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बादलीने सर्वत्र चर्चा होत आहे. याआधीच्या मुख्यमंत्र्यांना जे जमू शकलं नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. हे अधिकारी अनेक वर्ष एकाच विभागात तळ ठोकून होते. त्यामुळे एखाद्या सचिवापेक्षाही जास्त ‘पॉवर’ हे अधिकारी दाखवत होते. टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अशक्यप्राय असणारी गोष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांची फेरबदल केली. मंत्रालयातील अनेक अधिकारी हे वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही त्यांचा अधिक दबदबा होता. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांची बदली करू शकत नव्हते. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. `प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.