ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरेंचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या रश्मी या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथेच क्वारंटाईन होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांनी जे जे रुग्णालयात कोरोनावरील लस टोचून घेतली होती.
राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातही कोरोनाने शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वीच पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. आता रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
Previous Articleतरुणीची छेड काढल्याच्या समजूतीतून तरुणावर प्राणघातक हल्ला
Next Article डॉक्टर मी होणार








