मुंबई / ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ४ वाजता महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला गृह खात्याचे मोठे अधिकारी हजर राहणार आहेत.
विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काल दिल्लीत देखील शरद पवार यांनी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज बैठक बोलावल्याने राज्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.