प्रतिनिधी /वास्को
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दुपारी दाबोळीतील नवेवाडे भागातील गणपती देवस्थानला भेट देऊन गणेश जयंती उत्सवात सहभाग घेतला. नवेवाडेत त्यांचे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन गणेशाचा पाळणाही हलवला. यावेळी दाबोळीचे आपचे उमेदवार प्रेमानंद नाणोस्कर उपस्थित होते. साधारण अर्धा तास मुख्यमंत्री केजरीवाल या ठिकाणी होते.
दरम्यान, राज्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनीही गणेश जयंती उत्सवात सहभागी होऊन देवदर्शन घेतले.









