वृत्तसंस्था/ जयपूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील सुरु झालेल्या सय्यद मुस्ताक अली चषक टी-20 स्पर्धेतील शनिवारच्या सामन्यात मुंबईने जम्मू-काश्मिरचा 37 धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 5 बाद 138 धावा जमविल्या. सलामीच्या यशस्वी जैस्वालने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 36 चेंडूत 50, कर्णधार रहाणेने 31 चेंडूत 1 चौकारासह 31, दुबेने 15 तर रघुवंशीने 16 धावा केल्या. त्यानंतर जम्मू-काश्मिरचा डाव 17.3 षटकात 101 धावात आटोपला. अब्दुल समादने नाबाद 38 तर युद्धवीर सिंगने 21 धावा जमविल्या. मुंबईतर्फे मुल्लानीने 3 तर धवल कुलकर्णी, अवस्थी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









