सावंतवाडी / प्रतिनिधी-
‘मुंबई सकाळ’ चे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे आज दुःखद निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. कोरोनावर मात करून गेल्याच आठवड्यात ते घरी परतले होते. काल रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले होते. तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी सौ क्षमा नार्वेकर यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली,जावई आणि खूप मोठा आप्तपरिवार आहे.
मराठी पत्रकारितेत सुमारे पाच तप कार्यरत राहिलेल्या नार्वेकर यांनी दैनिक नवाकाळ'चे बातमीदार, दैनिक
सकाळ’ चे संपादक, दैनिक `पुण्यनगरी’ वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक ही सर्व महत्त्वाची जबाबदारीची पदे भूषविली होती. कोकणातील आरोंदा या गावातून मुंबईत आलेल्या नार्वेकर यांनी आपली कोकणची बांधिलकी अखेरपर्यंत जपली.