मुंबई / वृत्तसंस्था
सईद मुश्ताक अली चषक टी-20 स्पर्धेकरिता एकत्रित आलेल्या मुंबई क्रिकेट संघातील 4 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. हा संघ गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या चाचणीत शम्स मुलाणी, साईराज पाटील, प्रशांत सोळंकी व सर्फराज खान हे 4 खेळाडू बाधित आढळल्याचे सूत्राने नमूद केले. मुंबई क्रिकेट संघटनेने लगोलग पर्यायी खेळाडू निवडले असून त्यांची लवकरच घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईचा ब गटात समावेश असून 4 नोव्हेंबर रोजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे.









