वृत्तसंस्था/ मुंबई
बेंगळूरमध्ये 6 जूनपासून खेळविल्या जाणाऱया रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यासाठी मुंबई संघाचे नेतृत्व सलामीचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीने सोमवारी या आगामी सामन्यांसाठी मुंबईचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे देण्याचा निर्णय घेतला. मुंबई संघामध्ये सर्फराज खान तसेच अरमान जाफर आणि यशस्वी जैस्वाल या नवोदितांचा समावेश करण्यात आला आहे. आदित्य तरेकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी राहिल. धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मुलानी यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहिल.
मुंबई संघ- पृथ्वी शॉ (कर्णधार), जैस्वाल, भुपेन लालवाणी, अरमान जाफर, सर्फराज खान, सुवेद पारकर, ए. गोमेल, आदित्य तरे, हार्दिक तमोरे, अमन खान, साईराज पाटील, शम्स मुलानी, धुमिल मटकर, तनुष कोटियान, शशांक आतार्डे, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, सिद्धार्थ राऊत आणि मुशीर खान.









