प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसर नामकरण समारंभ चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर तसेच लोकमान्य टिळक अध्यासन अभ्यास व संशोधन केंद्राचा उद्घाटन सोहळा 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ, फिनोलेक्स ऍपॅडमीसमोर, एमआयडीसी, रत्नागिरी येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रथम विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर करणार आहेत़ प्रास्ताविक मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड करणार आहेत़ तसेच टिळक अध्यासन केंद्राबद्दलची माहिती लोकमान्य टिळक अध्यासन केंद्राच्या प्र. संचालिका डॉ. सुचित्रा नाईक या करणार आहेत़ यानंतर सत्कार समारंभ तसेच डॉ राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा पुस्तक अनावरण समारंभ होणार आह़े डॉ. सुमित कीर, दूरदर्शनचे निवृत्त सहा. संचालक जयु भाटकर, डॉ. राजेंद्रप्रसाद मसुरकर तसेच खासदार विनायक राऊत व मंत्री उदय सामंत यांची भाषणे होणार आहेत़ त्यानतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम कोविड प्रादुर्भावामुळे सर्व नियम व अटींचे पालन करुन करण्यात येणार आहे.









