ऑनलाईन टीम / मुंबई :
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई मॅरेथॉनमध्ये एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
गजानन माळजळकर असे मृत्यू झालेल्या धावपटूंचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.15 वाजता सुरु झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये माळजळकर यांनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर 4 किलोमीटर अंतर धावल्यानंतर ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्मयाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआचा डेरारा हरीसा विजेता ठरला आहे. या मॅरेथॉनमध्ये 55 हजार धावपटूंनी सहभाग घेतला आहे. तर महिलांनी ‘हाफ रन’ मॅरेथॉनमध्ये ठसा उमटवला आहे.