ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकास आघाडीचे नवे मिशन ठरले असून महाविकास आघाडी आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र लढणार आहे.
दरम्यान, सध्या नवी मुंबईत भाजपची सत्ता आहे. राज्य सरकारपाठोपाठ नवी मुंबईतही भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरु आहे. या अंतर्गत उद्या शहरात महाविकास आघाडीचा पहिला मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
या मोर्चाला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विश्वजीत कदम आदी उपस्थित राहतील.









