कोकणी प्रवासी – कर्मचाऱयांना फटका, तेजस किंवा डबलडेकरचा बळी शक्य
प्रा. उदय बोडस / रत्नागिरी
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात धावलेल्या पहिल्या खाजगी रेल्वेच्या यशानंतर भारतीय रेल्वेने नव्या वर्षात मुंबई येथून 10 खाजगी रेल्वे गाडय़ा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 दिवसात या गाडय़ांसाठी निविदा मागवण्यात येणार असून त्यात ‘मुंबई-मडगाव इंटरसिटी एक्सप्रेस’चा समावेश आहे. या प्रस्तावित खाजगी रेल्वेचा मोठा फटका कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी गाडय़ा व कोकण रेल्वे कर्मचाऱयांना बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
4 ऑक्टोबर 2019 रोजी नवी दिल्ली – लखनौ मार्गावर सुरू झालेल्या ‘तेजस’ एक्सप्रेसच्या मागोमाग आता 17 जानेवारी 2020 रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गावर खाजगी रेल्वे सुरु होणार आहे. त्यापाठोपाठ मुंबई-पुणे व मुंबई-मडगाव या खाजगी रेल्वे गाडय़ांसाठी 20 जानेवारीपर्यंत निविदा मागवल्या जाणार असून मार्च 2020 मध्ये त्या सुरू करण्यात येणार आहेत. प्रस्तावित खाजगी इंटरसिटी एक्सप्रेस मुंबई-मडगाव अशी घोषणा झाल्याने कोकण रेल्वेचे कर्मचाऱयांची डोकेदुखी वाढणार असून त्या गाडीचा फटका कोकणी प्रवाशांना बसणार आहे.
वेळापत्रकावर 140 टक्के ताण
सध्या संगमेश्वर स्थानकात मत्स्यगंधा व नेत्रावती एक्सप्रेस गाडय़ांना थांबा देता येणार नाही असे पत्र कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंडय़े यांनी प्रवासी संघटनेला दिले आहे. त्या पत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखानुसार कोकण रेल्वे सध्या 140 टक्के क्षमतेने काम करत आहे. (पत्र सोबत छापले आहे) अशा वेळी 1 थांबा वाढवल्यास 10 ते 15 मिनिटे वेळापत्रक बिघडेल असेही म्हटले आहे.
‘टॉप प्रायोरिटी’मुळे कर्मचाऱयांवरही ताण
नवीन खाजगी गाडी प्रवाशांना 25 लाख रूपयांचा प्रवास वीमा आणि वेळेत पोहोचण्याची हमी देणारी आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये लखनौ, नवी दिल्ली खाजगी ‘तेजस’ एक्सप्रेस उशीरा गेल्याने प्रवाशांना सुमारे 1.30 लाख रूपयांचा ‘रिफंड’ द्यावा लागला होता. दिल्ली-लखनौ मार्ग दुहेरी आहे. तरी गाडीला विलंब झाला होता. आपला कोकण रेल्वे मार्ग एकेरी असून सध्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे. अशा वेळी जर ही खाजगी गाडी पुढील 2 महिन्यात सुरु झाली तर ‘बेलापूर’ येथील ‘मास्टर कंट्रोल’ यांना इतर गाडय़ांना वेगवेगळ्या स्थानकात थांबवून ठेवून ‘खाजगी इंटरसिटी’ ही टॉप प्रायोरिटी’ तत्वावर पळवावी लागेल. यामुळे वेळापत्रकावर अतिरिक्त ताण पडून त्याचा त्रास विविध स्थानकप्रमुख, तिकिट तपासनीस तसेच रेल्वेचे लोको-पायलट, असिस्टंट लोकोपायलट आणि गार्ड यांना होणार आहे.
एक सेवा रद्द करणार का?
सध्याच्या वेळापत्रकात मुंबई-पनवेल या पट्टयातून सकाळी 5 ते 8 या 3 तासात दिवा-सावंतवाडी जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस, डबलडेकर, मांडवी या 5 दैनंदिन गाडय़ांच्या जोडीला साप्ताहिक / द्वि साप्ताहिक तत्वावर संपर्कक्रांती आणि राजधानी एक्सप्रेस अशा 6 गाडय़ा रोज पळतात. प्रस्तावित नवीन खाजगी ‘इंटरसिटी’ ही सकाळी निघून रात्री परत येणार असल्याने या गाडय़ांपैकी ‘तेजस’ किंवा कदाचित डबलडेकर रद्द होण्याची शक्यता आहे. सध्या जी ‘तेजस’ पळत आहे ती मुंबई-करमाळी अशी आहे. त्यापुढे वेर्णा-माजोर्डा-सुखती-मडगाव असा तिचा विस्तार केला तर ‘जनशताब्दी’चे वेळापत्रक मार खाणार आणि जर डबलडेकर रद्द करून त्या जागी इंटरसिटी बसवली तर वेळ सांभाळण्याच्या कसरतीमुळे केवळ सकाळच्या गोव्याकडील गाडय़ा नव्हे तर दुपारी मडगावहून सुटणाऱया 2 गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.
जर डबलडेकरची वेळ नव्या इंटरसिटीला दिली तर एक गाडीच रद्द होईल म्हणजे सध्या कोकणात येणाऱया प्रवाशांसाठी ज्या 5 सेवा परवडणाऱया दरात आहेत त्यातील एक रद्द होईल. मी ‘तेजस’ ला परवडणारी मानतो, राजधानी एक्सप्रेस नव्हे. नव्या इंटरसिटीचे तिकिट हे सध्याच्या तेजस एक्सप्रेसच्या तिकिटापेक्षा 40 टक्के जादा असेल म्हणजे ती गाडी धनदांडग्यांसाठी चालवलेली गाडी असेल.
सामान्य प्रवाशांचे हाल होणार
खाजगी नव्या इंटरसिटीचे वेळापत्रक पहाटे मुंबईहून प्रस्थान व दुपारी मडगाव येथून प्रस्थान असे ठेवले तर त्याचा खरा व मोठा फटका दिवा-सावंतवाडी, रत्नागिरी-दादर, सावंतवाडी-दिवा आणि रात्री परतणारी दादर-रत्नागिरी या 4 पॅसेंजर गाडय़ांना बसेल. यापैकी दिवा-सावंतवाडी व सावंतवाडी दिवा या गाडय़ा वस्तीच्या असल्याने त्यांचा उशीर चालू शकेल पण जर रत्नागिरी-दादर पॅसेंजरला उशीर झाला तर दिव्यातूनच परत फिरवणे किंवा दादरहून 3.30 (दुपारी) ऐवजी 4.55









