प्रतिनिधी/ रत्नागिरी
जयगड समुद्रात घडलेली बोट दुर्घटनेचा तपास हा यलोगेट मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आह़े समुद्रामध्ये 12 नॉटिकल पर्यत रत्नागिरी पोलिसांची हद्द आहे. बोट दुर्घटना ही समुद्रात 21 नॉटीकलवर घडल़ी त्यामुळे या घटनेचा तपास मुंबईतील यलोगेट पोलिसांकडून करण्यात येईल अशी माहिती रत्नागिरी पोलिसांकडून देण्यात आली आह़े
बोट दुर्घटनेतील अद्याप एकच मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आह़े सुरूवातील जयगड पोलिसांकडून बोटीवर 6 जण असल्याचे सांगण्यात आले होत़े मात्र बोटीवर एकूण 7 जण असल्याची माहिती आता समोर आली आह़े त्यापैकी अनिल आंबेरकर या खलाशाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आह़े तर अन्य 6 जण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आह़े कोस्टगार्ड व रत्नागिरीसह जयगड पोलिस व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बेपत्ता खलाशांचा शोध घेतला जात आह़े
मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना 12 नॉ†िटकल पर्यंतच मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आली आह़े असे असतानाही संबंधित बोट 21 नॉटिकल पर्यंत समुद्रात गेली कशी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयगड बंदर येथून नासिर हुसेनमियाँ संसारे (ऱा जयगड) त्यांच्या मालकीची बोट नावेद (आयएनडीएमएच4एमएम3555) 26 ऑक्टोबर रोजी मच्छीमारीसाठी बोट समुद्रात गेली होत़ी या बोटीवरव 7 खलाशी होत़े दरम्यान 28 ऑक्टोबरला ही मच्छीमार बोट परत येणे अपेक्षित होते मात्र ही बोट परत जयगड बंदरात आली नाह़ी
एका खलाशाचा मृतदेह हा 21 नॉटीकल खोल समुद्रात आढळून आला आह़े त्यामुळे ही बोट दुघटना 21 नॉटीलकवर घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आह़े सोमवारी देखील जयगड समुद्रात या बोटीचा व बेपत्ता असलेल्या खलाशांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आल़े कोस्टगार्ड, जयगड पोलीस व स्थानिक मच्छीमार आपल्या बोटींसह या बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत़ मात्र 21 नॉटीलवर बेपत्ता खलाशांचा शोध घेणे पोलीस व कोस्टगार्डसाठी आव्हानात्मक ठरताना दिसून येत आह़े
बेपत्ता झालेले खलाशी
बेपत्ता खलाशांमध्ये दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल, गोकूळ नाटेकर, अमोल जाधव, सुरेश कांबळे आदी खलाशांचा समावेश आह़े तर अनिल आंबेरकर यांचा मृतदेह आढळून आला आह़े तर अन्य एका खलाशाचे नाव अद्याप समजू शकलेले नाह़ी 6जण हे गुहागर येथील असून 1 जण वरवडे गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े
खोल समुद्रात बोट दुर्घटना घडल्याने शोध कार्य आव्हानात्मक
जयगड समुद्रातील बोट दुर्घटना ही समुद्रात 21 नॉटिकल (सुमारे 40 किलोमीटर) वर घडलेली आह़े याठिकाणी जयगड पोलीस व कोस्टगार्डच्या बोट पोहचण्यात यशस्वी झाल्य़ा मात्र असे असले तरी एवढय़ा लांब शोधकार्य करणे आव्हानात्मक ठरत आह़े – सदाशिव वाघमारे (उपविभागिय पोलीस अधिकारी रत्नागिरी)









