प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी एस. टी. विभागातून लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मुंबई, पुणे मार्गावर वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हय़ातील चिपळूण आगारातून ठाणे, चिंचवड, बोरीवली गाडय़ा सुटणार आहेत. दापोली आगारातून ठाणे, नालासोपारा, बोरिवली तर खेड, देवरूख आणि लांजा आगारातून बोरीवली ही एकच गाडी सुटणार आहे. वातानुकूलित शिवशाही बससेवा गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे बंद होती. मात्र महामंडळाने या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.









