ऑनलाइन टीम / नाशिक :
कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुंबईमध्ये तर परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालता घराबाहेर पडल्यास अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता नाशिक मध्ये सुद्धा कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक शहरामध्ये मास्क वापरणे नागरिकांना सुट्टीचे केले आहे. यासंदर्भात स्वतंत्रपणे अधिसूचना आज जारी करण्यात आली.
यामध्ये प्रशासनाने म्हटले आहे की, नाशिक मध्ये सुद्धा कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून कोरोना चा प्रादुर्भाव रोखता येईल. यासंदर्भात नागरे पाटील यांनी सत्र प्रतिबंधक कायदा 1897 नुसार शहरात नागरिकांनी मास्कचा वापर करावा अशी अधिसूचना काढली आहे. या या सूचनेचे जे कोणी उल्लंघन करेल, त्याला भारतीय दंड संहिता कलम 1988 नुसार कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे. तसेच शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे.
हे मास्क घरगुती पद्धतीने तयार केलेले असले तरी सुद्धा चालतील. मात्र, मात्र ते योग्य पद्धतीने स्वच्छ व निर्जंतुक करून पुन्हा वापरण्याजोगे असेन याची काळजी बाळगावी, असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.









