ऑनलाईन टीम / मुंबई :
2020 यावर्षी मुंबईतील डेंग्यू रुग्णांची संख्या 86 टक्के कमी आहे. पावसाळा सुरु झाला की, जून पासून डिसेंबर महिन्यापर्यंतच्या काळात डेंग्यू वाढत असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू प्रमाण नियंत्रणात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
हे वर्ष कोरोनाचे मानले जात आहे. त्यामुळेच इतर आजार वाढू नये यासाठी पालिकेकडून दक्षता घेण्यात येत होती. पावसाळी आजारात डेंग्यू ही तेवढंच जीवघेणा असतो. त्यात कोरोनाची महामारी असल्याने पालिके समोर आव्हान उभे होते. यावेळी मात्र पालिकेच्या कीटकनाशक विभागाने कामगिरी बजावली. त्यामुळे मुंबईत डेंग्यूच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. 2019 वर्षाच्या जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 881 लोकांमध्ये डेंग्यूची लागण झाली होती. तर यावर्षी केवळ 11 जण डेंग्यू ग्रस्त झाले.
याबाबत अधिक माहिती देताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी सांगितले की, कीटकनाशक विभागाने बऱ्या पैकी डेंग्यू पैदास कमी केली आहे. शिवाय बहुतांश लोक गावी गेल्याने बरीच घरे बंद होती. त्यामुळे डेंग्यूची प्रकरणे फारच कमी आढळली. मात्र मुंबईतील ई आणि जी दक्षिण प्रभागात डासांच्या पैदासची सर्वाधिक ठिकाणे आढळली आहेत.
दरम्यान, डेंग्यूमुळे काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले व अंतर्गत प्रजननासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले.








