मुंबई/प्रतिनिधी
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya Former Member of the Lok Sabha) यांच्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar Member of the Maharashtra Legislative Assembly) आता विरोधी पक्षावर भ्रष्टाचारचे आरोप करू लागले आहेत. शेलारांनी मुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे. मुंबई कोस्टल रोडचं काम निकृष्ट दर्जाचं आहे, असा दावा देखील त्यांनी केला. कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचाराचा तवंग निर्माण झाला आहे, असं शेलार म्हणाले. याआधी देखील शेलार यांनी या कोस्टल रोडमध्ये (mumbai coastal road) १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पालिकेनं स्पष्टीकरण दिलं होतं. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून ते निराधार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने (mumbai municipal corporation) म्हटलं होतं.
आशिष शेलार यांनी शनिवारी मुंबई कोस्टल रोडसंदर्भात पत्रकार परिषद घेत मुंबई महानरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर (Shivsena) भ्रष्टाचाराचे आरोप केले. “आज मी महापालिकेवर आणि सत्ताधाऱ्यांवर थेट भ्रष्टाचार, अपव्यवहार आणि मुंबईकरांची लूटमार ही १ हजार ६०० कोटींची आहे. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार, अपव्यवहार आणि लूटमार महापालिका आणि सत्ताधाऱ्यांची ही लूट आहे. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग यायला लागला आहे,” असं शेलार म्हणाले. तसंच, करुन दाखवलं म्हणणाऱ्यांचा लोकांच्या जिवाशी खेळ सुरु आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.
.