ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई, कोकणासह रायगड भागात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 30 ऑगस्ट रोजी गोव्यासह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईत शुक्रवार पासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.








