ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या पुढे गेली आहे. त्यातही मुंबई शहरात रुग्ण वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या संकटात देखील पोलिस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. मात्र, हे पोलिसही आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
मागील चोवीस तासात मुंबईतील चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या अधिक माहिती नुसार हे चार पोलीस वाकोला, दिंडोशी, बोरिवली आणि संरक्षण विभागात कार्यरत होते. या चार पोलिसांच्या मृत्यूमुळे पोलीस बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर आता पर्यंत महाराष्ट्रात एकूण 3,388 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यातील 40 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुंबईतील पोलिसांचा आकडा 26 आहे. 1945 पोलिसांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 3,388 रुग्णांपैकी









