ऑनलाइन टीम / नवी मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे मुंबईत चिंताजनक स्थिती असून मुंबई शहर रेड झोन मध्ये आहे. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवी मुंबईच्या महापे येथील एका आय टी कंपनीतील 40 पैकी 19 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापे येथील एका डेटा कंपनीतील 40 कर्मचा-यांचे रूटीन चेक अप करण्यात आले होते. त्यामध्ये 19 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर उर्वरित कर्मचा-यांचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत.
या सर्वांचे रिपोर्ट खाजगी लॅबमधील असून पॉझिटिव्ह रूग्णांना मुंबई महापालिकेने तत्काळ आयसोलेट करून या सर्वांची ट्रॅव्हल हिस्टरी चेक करून सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









