ऑनलाईन टीम / मुंबई :
क्रिकेटमध्ये करिअर करता आले नाही म्हणून मुंबईतील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. मुंबईतील मालाड पूर्वेत 27 वर्षाच्या सिटी क्रिकेटर करण तिवारी या तरुणाने सोमवारी रात्री आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे करिअरमध्ये आयपीएल किंवा मोठ्या मॅचमध्ये खेळायची संधी न मिळाल्याने करण तिवारीनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या तरुणाने शेवटचा फोन राजस्थानमध्ये असलेल्या आपल्या मित्राला केला होता. मी मानसिक तणावात असून मी आत्महत्या करत असल्याचे त्याने मित्राला सांगितले. यानंतर मित्राने लगेचच राजस्थानमध्ये असलेल्या करणच्या बहिणीला याबाबत सांगितले.
बहिणीने याप्रकरणाची माहिती आईला फोन करून संगतली. मात्र, कुटुंबीय करणच्या खोलीत पोहचेपर्यंत उशीर झाला होता. कारण जेव्हा त्यांनी दारं उघडले, तोपर्यंत करणने गळफास घेतला होता.
करणच्या कुटुंबीयांनी कुरार पोलिसांना दिली. पोलीस आणि मृत्यूची नोंद करून घेतली असून पुढील तपास कुरार पोलिस करत आहेत.









