ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. तरी देखील महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विशेषत मुंबईत तर गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिकेने मुंबईमधील हॉटस्पॉट असलेले सर्व ठिकाणे सील केली आहेत. यामध्ये पालिकेकडून पोलीस रहात असलेली इमारत देखील सील करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील वसाहतीत राहणाऱ्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकास कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पोलिस निरीक्षक एस बी वन मध्ये कार्यरत होता. त्याला दोन तीन दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप येत असल्याने त्याने केईएम मध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांनी टेस्ट पॉझिटिव आली आहे.
दरम्यान, सध्या हा निरीक्षक रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या संपर्कातील लोकांना खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.









