पेठ वडगाव/प्रतिनिधी :
मुंबईहून पेठ वडगाव येथे आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वडगाव शहरात प्रशासनाची पुन्हा धावपळ उडाली. ही महिला भाड्याने रहात असलेला शेतकरी संघासमोरील परिसर प्रशासनाने सील करून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. शहरात पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. ही महिला तिचा पती व दोन मुली असे चौघेजण मुंबईहून पेठ वडगाव येथे पहाटे आले, चहापाणी आवरून ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास हातकणंगले येथे क्वारंटाईन केंद्रात अलगीकरणासाठी गेले होते. त्यांचे स्वॅब घेण्यात आले असता सायंकाळी महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. ही माहिती शहरात कळताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








