ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील हिरानंदानी सोसायटीमध्ये 390 जणांना बनावट लसीकरण करण्यातआले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर आणखी एका व्यक्तीला चौकशीसाठी मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे, त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या कांदिवली परिसरातील हिरानंदानी हाऊसिंग सोसायटीत 30 मे रोजी 390 जणांना कोव्हिशील्डची लस देण्यात आली. त्यावेळी राजेश पांडे नावाच्या एका व्यक्तीने स्वत:ला कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे प्रतिनिधी म्हणवून घेत सोसायटी कमिटीच्या सदस्यांकडे संपर्क साधला होता. संजय गुप्ता यांनी लसीकरण मोहीम राबविली होती, तर महेंद्र सिंग नावाच्या व्यक्तीने सोसायटीच्या सदस्यांकडून पैसे घेतले होते. समाजातील सर्व लोकांना बनावट लसी देण्यात आल्या आणि जवळपास पाच लाख रुपये घेऊन हे ठग फरार झाले होते.








