ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांवर कोरोना लसीच्या चाचणीला आज सुरूवात झाली. चाचणीसाठी मुलांना झायडस कॅडिलाच्या ‘झायको-डी’ या लसीचे तीन डोस देण्यात येणार आहेत. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 28 व्या तर तिसरा डोस 56 व्या दिवशी देण्यात येईल. नायर रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भारमल म्हणाले, आज लसीच्या चाचणीसाठी दोन मुलांची नोंद करण्यात आली. 12 ते 17 वर्ष वयोगटातील एकूण 50 मुलांवर ही चाचणी घेण्यात येणार आहे. निरोगी आणि ऍन्टीबॉडीज नसलेल्या मुलांना या चाचणीत सहभागी करुन घेतले जाईल. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.









