मुंबई/प्रतिनिधी
माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी शिवसेनेवर टीका केली होती. निलेश राणे यांनी चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेनं नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा गंभीर आरोप केला होता. आता त्यांचे बंधू भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सण-उत्सवांसंदर्भात राज्य सरकारकडून लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधांवरून निशाणा साधला.
दरम्यान, पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या मदतीवरून टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले होते. निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सरकारकडून सण उत्सवांसाठी नियमावली ठरवून दिली जात असून, याच मुद्यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी हिंदू समाज.. हिंदू सण.. हिंदू संस्कृती वर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत. ज्या पद्धतीने पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
काय आहे नितेश राणेंचं ट्विट
हिंदू समाज.. हिंदू सण.. हिंदू संस्कृती वर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत.
आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने..
असंख्या घटना कानावर येत आहेत.. पश्चिम बंगाल सारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे!!!