ऑनलाईन टीम / मुंबई :
कंगना आणि शिवसेना वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिकेने कंगना च्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. या कारवाईचा व्हिडिओ ट्विट करत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

कंगनाने मुंबईमधील घरी पोहोचताच एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये कंगनाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
उद्धव ठाकरे आज तुम्ही माझे घर तोडले आहे उद्या तुमचे गर्वहरण होईल. वेळ नेहमी एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर उपकार केले. काश्मिरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होते. परंतु आज मी ते स्वतः अनुभवले. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्येवरच नाही.. तर काश्मिरी पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद जय महाराष्ट्र… असे कंगनाने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.









