ऑनलाईन टीम /मुंबई
झोपडपट्ट्या आणि गजबजलेल्या परिसरात आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला (Firebriged) लवकरच फायरबाइक (Firebike) मिळणार आहेत. मुंबई महानगरपालिका (Mumbai corporation) 3.15 कोटी (3.14 cr ) रुपये खर्च करून 24 बाईक खरेदी करणार असून यामध्ये त्यांच्या एकूण देखभाल खर्चाचा समावेश आहे. बुधवारी फायर बाईक खरेदीचा प्रस्ताव नागरी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. जानेवारी २०२० मध्ये मांडण्यात आलेला हा प्रस्ताव कोव्हिड परिस्थितीमुळे प्रलंबित होता.
एका बाइकची किंमत 2.76 कोटी रुपये असुन पाच वर्षांसाठी सेवा आणि देखभालीसाठी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त 28.32 लाख रुपये खर्च करत आहे. या खर्चामध्ये बाईकचे असेंब्लींग आणि कमिशनिंग तसेच देखभाल यांचा समावेश असून वर्कऑर्डर दिल्यानंतर दोन महिन्यांत बाइक्सचा समावेश महानगरपालिकेच्या ताफ्यात केला जाईल असे BMCच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अधिक माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, फायर बाईकमध्ये पाण्याची टाकी, पाण्याचे पाइप, होज रील आणि पंप बसवण्यात येणार आहेत. बाईकमध्ये अग्निशमन उपकरणांसह सुमारे 40 लिटर पाणी वाहून नेऊ शकणार्या टाक्या बसवल्या जातील. या बाइक GPS यंत्राने चालवल्या जातील आणि बाईकला जोडलेला पंप एका मिनिटात 8 लिटर पाणी फवारण्यास सक्षम असेल. दोन अग्निशमन दलाचे जवान बाईकवर स्वार होऊ शकतील. अग्निशमन दल मोठ्या पाण्याचे टँकरसह टीम पोहोचण्यापूर्वी घटनास्थळी पोहोचू शकतात आणि परिस्थितीचे मूल्यांकन करून कमांड सेंटरला परत अहवाल देऊ शकतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








