मंडणगड/ प्रतिनिधी
मुंबईत स्थित चाकरमनी कोकणवासीयांचे गावाकडील परतीच्या प्रवासाकरिता राज्यशासनाचे आदेशाने नियोजीत केलेले कोकणातील पहिली लालपरी प्रशासकीय अडथळ्याची शर्यती पार करत 10 मे 2029 रोजी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयाचे परिसरात दाखल झाली. शनिवारी रात्री 8.00 वाजता मुंबई नालासोपारा येथून मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावी येण्यासाठी ही बस मार्गस्थ झाली होती.
बसमध्ये आबंडवे गावातील 21 नागरीक व 4 लहान मुले तालुक्यातील आपल्या गावी जाण्यासाठी मार्गस्थ झाले होते. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासकरिता मंडणगड तालुक्यास मुंबई व महानगरास गाडी मार्गाने जोडणारे म्हाप्रळ व लाटवण हे दोन्ही मार्ग प्रातांधिकारी दापोली यांनी चार दिवासपुर्वी काढलेल्या आदेशामुळे बंद करण्यात आलेले असल्याने नालासोपारा येथून आंबडवे येथे येण्यासाठी मार्गस्थ झालेली गाडी महाड पोलादपुर, कशेडी, खवटी मार्गाने प्रथम खेड तालुक्यात दाखल झाली. येथे गाडीतील सर्व प्रवाशांचे स्वाब तपासणी करण्याकरिता गाडीतील प्रवशांसह गाडी लवेल येथे मार्गस्थ झाली.
लवेल येथे पोहचल्यावर तेथील क्वारंटाईन सेंटर आधीच पुर्णपणे भरलेली असल्याने व लवेल येथे गाडीतील सर्व प्रवाशांचे स्वाब घेणे शक्य नसल्याने प्रशासकीय यंत्रणेने गाडीसह सर्व प्रवाशांची रवानगी मंडणगड येथे केली त्यामुळे दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास 21 प्रवाशांनी भरलेली गाडी भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. यानंतर तालुका आरोग्य विभाग व स्थानीक प्रशासनाने पुढील कारवाईस सुरुवात केली. असून आरोग्य विभागाने गाडीतील प्रवाशांची लेझर गन चे माध्यमातून तपासणी केली आहे. या गाडीतून आलेल्या सर्व प्रवाशांनी मुंबई येथून वैद्यकीय तपासणी दाखला सोबत घेऊन, शासनाची अधिकृत परवानगी घेऊन आलेल्या असल्याने याशिवाय आलेले सर्व प्रवाशी नॉन केंटन्टेंमेंट झोन मधून आलेले असल्याने त्यांना गावातील महाविद्यालयामध्ये निर्माण केलेल्या विलगीकरण केंद्रांत चौदा दिवसांकरिता ठेवण्यात येणार असल्याची माहीती तहसिलदार मंडणगड यांच्याकडून मिळाली आहे. नागरिकांच्या निवासाची सर्व सोय ग्रामस्थ करणार असल्याची माहीती या निमीत्ताने मिळाली आहे. असे असली तरी सर्व प्रवाशी ग्रामस्थांची कोरना तपासणी करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
समन्वयाचा अभाव
राज्यशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता दिल्यानंतर मुंबई महानगरांतून कोकणात आपल्या गावी परत जाण्यासाठी मुंबईस्थित कोकणवासीयांना त्यांच्या वास्तवाच्या प्रशासन अनुमती देत आहे, गावी जाणाऱया नागरीकांना कसा प्रवास करावा, त्यासाठी आवश्यक परवानग्या कोठून प्राप्त कराव्यात, या विषयी राज्यशासने आदेश काढून मार्गदर्शक सुचनाही प्रसिध्द केल्या आहेत राज्य परिवहन महामंडळास प्रवाशांची वाहतूक कशी करावी याच्या मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत असे असताना कोरोना चाचणीकरिता खेड तालुक्यातील लवेल व तेथून मंडणगड असा प्रवास करावा लागल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून यापुढील काळात स्वाब देण्याची तसेच विलीगीकरणाची प्रकाराची टांगती तलवारही त्यांच्यावर उभी आहे.