पोलीस आयुक्त-पोलीसप्रमुखांकडे केली तक्रार : चौकशी पूर्ण झाल्यानंतर होणार निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
शिनोळी (ता. चंदगड) येथील एका कारखान्याच्या व्यवहारासंबंधात मुंबई येथील व्यावसायिकाला पोलीस मुख्यालयात तब्बल आठ तास कोंडून ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यात ही घटना घडली असून यासंबंधी पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलीसप्रमुखांनी चौकशीही केली आहे.
मुंबई येथील गिरीश हुद्दार या व्यावसायिकाने बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी वरि÷ अधिकाऱयांकडे लेखी तक्रार केली असून जिल्हा पोलीसप्रमुखांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे.
शिनोळी येथील वैजनाथ इंडस्ट्रीज या कारखान्याच्या व्यवहारासाठी बेळगावात आलो असता आपल्याला पोलीस मुख्यालयात नेऊन तब्बल आठ तास डांबून ठेवण्यात आले होते. कारखान्याच्या भागीदारीतून बाहेर पडण्यासाठी पोलीस अधिकाऱयांकडून दबाव आणून धमकावण्यात आल्याची माहिती गिरीश यांनी दिली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
गिरीश हुद्दार यांनी पोलीस निरीक्षक के. एस. रायमाने यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील तीन पोलीस व कारखान्यातील भागीदार दीपक बिर्जे आदींवर तक्रार केली आहे. 2 नोव्हेंबर रोजी ही तक्रार पोलीस अधिकाऱयांकडे पाठविण्यात आली असून एफआयआर दाखल करण्यासाठी मार्केट पोलिसांकडेही एक प्रत पाठविण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रति राज्य पोलीस महासंचालकांसह इतर वरि÷ अधिकाऱयांना पाठविण्यात आल्या आहेत.
शिनोळी येथील वैजनाथ इंडस्ट्रीजमध्ये आपण संचालक आहोत. दीपक बिर्जे, जीवन बिर्जे, दयानंद शास्त्राr हेही संचालक आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कारखान्यासंबंधी वाद सुरू आहेत. यासंबंधी चर्चा करण्यासाठी दीपक व दयानंद यांनी आपल्याला बेळगावला बोलाविले. 27 ऑक्टोबर 2020 रोजी आपण बेळगावात आलो. 29 ऑक्टोबर रोजी कामानिमित्त बँकेला जायचे होते. बँकेऐवजी कोल्हापूर सर्कलजवळ आपल्याला बोलाविण्यात आले. त्यानंतर शिवा हॉटेलजवळून एका कारमध्ये कोंबून पोलीस मुख्यालयात नेण्यात आल्याचे गिरीश यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक के. एस. रायमाने यांच्या कार्यालयात तब्बल आठ तास आपल्याला केंडून ठेवण्यात आले. “माझ्या नावचे समभाग (शेअर्स) दीपक बिर्जे यांच्या नावे हस्तांतर करून संचालकपदाचा राजीनामा द्या, नाही तर मुंबईच्या घरातून तुला कधीही उचलतो!’’ असे पोलीस अधिकाऱयांनी धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोऱया स्टॅम्पवर सहय़ा करण्यासाठी धमकावण्यात आले आहे.
संशयाने आपली पत्नी शिवा हॉटेलजवळ आली. तिला आपण कल्पना देऊन ठेवली होती. तेथे आपली गाडी पाहून ती शोधत पोलीस मुख्यालयाजवळ पोहोचली. पत्नी पोहोचल्यानंतर पाच वाजता आपली सुटका करण्यात आली. तोपर्यंत पत्नीशी बोलण्यासही दिले नाही. घाबरलेल्या अवस्थेत प्रथम आपण मुंबई गाठली. 30 ऑक्टोबर रोजी समतानगर पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी पोहोचलो, त्यावेळी जिथे घटना घडली आहे, तेथे तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे आपण बेळगाव येथील अधिकाऱयांकडे तक्रार करीत असल्याचे गिरीश हुद्दार यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
गिरीश हुद्दार यांनी पोलीस निरीक्षक के. एस. रायमाने यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील तीन पोलीस व कारखान्यातील भागीदार दीपक बिर्जे आदींवर तक्रार केली आहे. 2 नोव्हेंबर रोजी ही तक्रार पोलीस अधिकाऱयांकडे पाठविण्यात आली असून एफआयआर दाखल करण्यासाठी मार्केट पोलिसांकडेही एक प्रत पाठविली आहे. या तक्रारीच्या प्रति राज्य पोलीस महासंचालकांसह इतर वरि÷ अधिकाऱयांना पाठविण्यात आल्या आहेत.
शिनोळी येथील वैजनाथ इंडस्ट्रिजमध्ये आपण संचालक आहोत. दीपक बिर्जे, जीवन बिर्जे, दयानंद शास्त्राr हेही संचालक आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कारखान्यासंबंधी वाद सुरू आहेत. यासंबंधी चर्चा करण्यासाठी दीपक व दयानंद यांनी आपल्याला बेळगावला बोलाविले. 27 ऑक्टोबर 2020 रोजी आपण बेळगावात आलो. 29 ऑक्टोबर रोजी कामानिमित्त बँकेला जायचे होते. बँकेऐवजी कोल्हापूर सर्कलजवळ आपल्याला बोलाविण्यात आले. त्यानंतर शिवा हॉटेलजवळून एका कारमध्ये कोंबून पोलीस मुख्यालयात नेण्यात आल्याचे गिरीश यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक के. एस. रायमाने यांच्या कार्यालयात तब्बल आठ तास आपल्याला केंडून ठेवण्यात आले. “माझ्या नावचे समभाग (शेअर्स) दीपक बिर्जे यांच्या नावे हस्तांतर करून संचालकपदाचा राजीनामा द्या, नाही तर मुंबईच्या घरातून तुला कधीही उचलतो!’’ असे पोलीस अधिकाऱयांनी धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोऱया स्टॅम्पवर सहय़ा करण्यासाठी धमकावण्यात आले आहे.
संशयाने आपली पत्नी शिवा हॉटेलजवळ आली. तिला आपण कल्पना देऊन ठेवली होती. तेथे आपली गाडी पाहून ती शोधत पोलीस मुख्यालयाजवळ पोहोचली. पत्नी पोहोचल्यानंतर पाच वाजता आपली सुटका करण्यात आली. तोपर्यंत पत्नीशी बोलण्यासही दिले नाही. घाबरलेल्या अवस्थेत प्रथम आपण मुंबई गाठली. 30 ऑक्टोबर रोजी समतानगर पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी पोहोचलो, त्यावेळी जिथे घटना घडली आहे, तेथे तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे आपण बेळगाव येथील अधिकाऱयांकडे तक्रार करीत असल्याचे गिरीश हुद्दार यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
पोलीसप्रमुखांकडून चौकशी
यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता गिरीश हुद्दार यांनी पाठविलेला तक्रार अर्ज आपल्याला मिळाला आहे. यासंबंधी आपण चौकशीही केली आहे. संबंधितांवर कारवाईसाठी बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांकडे शिफारस करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकार आपल्याही लक्षात आला आहे. पोलीस मुख्यालयात घटना घडल्यामुळे त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढे काय करायचे हे ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.