वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबईतील विविध संघांकडून व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात खेळणारा दादरचा फुटबॉलपटू 26 वषीय स्कॉट डिसोजाचे बुधवारी मैदानावर निधन झाले. बुधवारच्या सामन्यात 45 मिनिटांच्या पूर्वार्धानंतर पुन्हा उत्तरार्धातील खेळासाठी डिसोजा मैदानात प्रवेश केल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. काही वेळ तो गोलपोस्टच्या बाजूला बसून राहिला. त्याच्या मित्रांनी लागलीच त्याला रुग्णालयात नेण्यासाठी सर्व तयारी केली. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
डिसोजाने यापूर्वी मुंबईतील पीफा कुलाबा, युनियन बँक, एअर इंडिया आणि केएफए या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. दोन महिन्यांपूर्वीच स्कॉट डिसोजा यांच्या वडिलांचे निधन झाले होते. 2017 साली झालेल्या हौशी गटातील फाईव्ह ए साईड फुटबॉल स्पर्धेत स्कॉट डिसोजाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.









