ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे माहिती दिली.

या अंतर्गत आज मध्यरात्री पासून मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. आज मध्यरात्री पासून 15 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, पहाटे 5 ते रात्री 9 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच या कालावधीत सर्व सामान्यांना केवळ 2 किलोमीटर पर्यंतच प्रवास करता येणार आहे. मात्र, हा प्रवास केवळ अत्यावश्यक कामांसाठी करता येणार आहे.









