नाशिक \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ४३ मंत्र्यांना राष्ट्रपती भवनात गोपनियतेची शपथ दिली. मोदींच्या मंत्रिमंडळात ३६ नव्या चेहऱ्यांना सामाविष्ट करण्यात आलं. महाराष्ट्रातून चार नेत्यांना केंद्रात मंत्रीपद दिलं असताना दुसरीकडे प्रितम मुंडे यांना डावलल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान प्रितम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे भगिनी नाराज नसल्याचं म्हटलं आहे.
नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी नाराज,हे कोण म्हणतं? निर्णय पक्ष वरीष्ठ स्तरावरून घेतो. मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका,त्या नाराज नाहीत, असं ते म्हणाले.
नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारामुळे युतीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला का? या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेतलं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








