मुंबई/प्रतीनिधी
ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या भावना व्यक्त करत मुख्यमंत्री आणि खास करून संजय राऊत यांचे विशेष आभार मानले.
दरम्यन,कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. राज्यात बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारले आहेत. दरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त करत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे आभार मानले. तसेच उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनापासून धन्यवाद मानले. पण चर्चेचा विषय ठरला तो संजय राऊतांविषयी केलेल्या वक्तव्याचा. यावेळी बोलताना आमदार सरनाईक यांनी मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार सरनाईक यांनी “मुख्यमंत्री साहेब तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आजपासून हा प्लँट कार्यरत होत आहे. या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. खासकरून संजय राऊत साहेब यांचे. मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात. आता दुसऱ्यांनाही ते ऑक्सिजन देत आहेत.”, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.