ऑनलाईन टीम / मुंबई :
मी पोकळ धमक्या देत नाही. मी थेट कृती करणारा व्यक्ती आहे, असा इशारा खासदार संजय राऊत दिला आहे. अभिनेत्री कंगना राणौतच्या आरोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरमध्ये या बाईला एकदा शुटिंगला पाठवायला हवे. हा मुंबई, महाराष्ट्राचा अपमान आहे. पोलिसांनी शहीद होवून मुंबई वाचवलीय, रक्षण केले. अशा मुंबई पोलिसांवर कुणीतरी एैरगैरे लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही असे लोक बोलत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही राऊत यांनी यावेळी केली. तसेच मुंबईत मेंटेल केसेस वाढतायत, त्याकडं आरोग्य विभागानं लक्ष द्यायला हवे असा टोला त्यांनी लगावला.
- मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे… हिम्मत असेल तर रोखून दाखवा : कंगना
दरम्यान, कंगना ने पुन्हा एकदा नवीन ट्विट केले आहे.

ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा. असे ट्विट करत कंगनाने धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.









