कोल्हापूर \ ऑनलाईन टीम
मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. मपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला.
कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पावसामुळे आणि पुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीत सरकारकडून पॅकेज जाहीर केलं जावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच, त्यावरून उद्धव ठाकरे यांनी लगेचच टोला लगावला. मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री देखील मदत करणारे मंत्री आहेत. मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितलं आहे. अजूनही सांगली, कोल्हापूरमधलं पाणी पूर्ण ओसरायचं आहे. या संकटाचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मदतीवर विचार करणार आहोत. तात्काळ मदत आम्ही जाहीर केलीच आहेत. एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज देखील मी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली आहे. हे एनडीआरएफचे निकष २०१५चे आहेत. गेल्या वेळी आपण एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन मदत केली आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
कोल्हापुरात मी दोन तीन ठिकाणी फिरलो. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी माझ्यासमोर मांडल्या. दरवर्षी या ठिकाणी पूर येतो. आम्ही कष्टाने कमावतो. त्यामुळे संसार उद्धवस्त होतात. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा, असं लोक म्हणत आहेत. नद्यांच्या अतिरिक्त पाण्याचं नियोजन करायचं आहे. नुसता अभ्यास नाही तर आराखडा तयार करावा लागणार आहे. खचणारे रस्ते, कोसळणाऱ्या दरडी यामुळे भूगर्भाचाही अभ्यास करायचा आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








