नवी दिल्ली
इंटेलचा पॉवर मॅनेजमेंट चिपचा व्यवसाय 630 कोटी रुपयांना मीडियाटेक यांनी खरेदी केला आहे. यासंबंधीचा करार नुकताच अंतिम करण्यात आला आहे. तैवानच्या या कंपनीने इंटेलचा चिप निर्मितीचा कारखाना खरेदी केला आहे. ही खरेदी सहकारी कंपनी रिचटेकच्या मार्फत मीडियाटेकने केली आहे. 630 कोटी रुपयांना खरेदी झालेल्या या व्यवहारानंतर मीडियाटेकला याचा फायदा आपल्या उत्पादनांच्या विस्तार, विकासासाठी होणार आहे. याचा कंपनीला बाजारातील वाटा आणखी मजबुत करण्यासाठी फायदा होणार आहे.









