मिसबिहेवियर या चित्रपटाची गोष्ट 1970 सालातील आहे. लंडन येथे मि वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या काळातला तो जगातला लोकप्रिय कार्यक्रम होता. या स्पर्धेत महिलांच्या आत्मसन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते असाही एक मतप्रवाह तयार झाला होता. त्यावेळी वुमन्स लिबरेशन मुव्हमेंटच्या सदस्यांतर्फे या लाईव्ह शोमध्ये हल्लाबोल करण्यात येतो आणि या शोमध्ये व्यत्यय आणला जातो. नेहमी कृष्णवर्णीयांना या स्पर्धेत डावलले जाते असा आरोपही करण्यात येतो. जेव्हा पुन्हा हा शो नीट सुरु होतो तेव्हा ठरलेली स्पर्धक विजेती न होता मिस ग्रेनाडाला हा किताब मिळतो. त्याची कहाणी या चित्रपटात आहे. फिलीपा लोथ्रोप यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून किरा नाईटली, जेसी बकली, गुगु बाथा- रॉ, किली हॉव्स, फिलीस लोगान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई









