मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यात सध्या ट्विटवर वॉर रंगल्याचे पाहण्यास मिळत आहे. अमृता फडणवीस यांनी तौत्के चक्रीवादळाचे थैमान सुरु असताना एक शायरी ट्विट केले होती. त्यांच्या या ट्वीटला रूपाली चाकणकर यांनी शायरांना अंदाजात उत्तर दिले होते. आता त्यांच्या याच शायरीला पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी उत्तर देत आपण टीकाकारांची फारशी पर्वा करत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही एक खोचक ट्विट करून अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांचे ट्वीट
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ”जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती !”
रूपाली चाकणकर यांचे ट्वीट
अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटल रूपाली चाकणकर यांनी ट्वीटमधून उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ”जंगल की शेरनी शिकार करती है…सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन !”
अमृता फडणवीस आणि रूपाली चाकणकर यांच्यात ‘या’ ट्वीटवरून रंगले आहे ट्वीटर वॉर
मुंबईत सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचे थैमान सुरु असताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. ”तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !”, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यांच्या याच शायराना ट्वीटचे रूपाली चाकणकर यांनी शायराना अंदाजात उत्तर दिले होते. ”तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है.महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!” यावरून सध्या अमृता फडणवीस आणि रूपाली चाकणकर यांच्यात ट्वीटर वॉर रंगले आहे.








