चित्रपटगृहांमध्ये झळकणार रानी मुखर्जीचा चित्रपट
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रानी मुखर्जीचा आगामी चित्रपट ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा झाली आहे. एम्मे एंटरटेनमेंटने स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. हा चित्रपट 20 मे रोजी झळकणार आहे.
सत्य घटनेवर आधारित

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मुले आणि मानवाधिकारांचा मुद्दा चर्चेत आणला होता. हा चित्रपट बायो बबलमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. तसेच एस्टोनिया आणि भारतातील काही ठिकाणी चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण करण्यात आले. तत्पूर्वी एम्मे एंटरटेनमेंटने चित्रिकरणातील एक छायाचित्र शेअर केले होते. यात रानी मुखर्जी स्वतःच्या चित्रपटाच्या पूर्ण टीमसोबत दिसून आली होती. आशिमा छिब्बरकडून दिग्दर्शित चित्रपट ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची निर्मिती मोनिशा अडवाणी, मधू भोजवानी आणि निखिल अडवाणी यांची कंपनी तसेच झी स्टुडियोकडून करण्यात आली आहे.









