ऑनलाईन टीम / जॅकसन :
अमेरिकेतील मिसिसीपी प्रांत आपला ध्वज बदलणार आहे. ध्वजामध्ये बदल करण्याच्या निर्णयाला मिसिसीपी राज्याच्या विधानसभेची मंजुरी मिळाली आहे.
1894 साली मिसिसीपीचा ध्वज बनवलेला आहे. हा विभाजनवादी असल्याचे मानले जाते. संघराज्याच्या प्रतिकाला राज्याच्या ध्वजावरून हटवण्यात यावे, अशी मागणी होत होती. त्यानंतर मिसिसीपी प्रांताने आपला ध्वज बदलण्याचा निर्णय घेतला असून, विधानसभेमध्ये ध्वजातील बदलासंबंधीचे विधेयक दोन तृतीयांश बहुमताने मंजूर झाले आहे.
संघराज्याविरोधातील आपले पहिले पाऊल म्हणून मिसिसीपीच्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाकडे बघितले आहे. ध्वजामध्ये बदल करण्याच्या निर्णयाला मिसिसीपी राज्याच्या विधानसभेची मंजुरी मिळाल्याने सिनेटमध्ये ध्वज बदलासंबंधीचे विधेयक मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रिपब्लिकन सदस्यांनी सिनेटमध्ये हे विधेयक मांडल्यास आपण ते मंजूर करू, असे मिसिसीपी राज्याचे गव्हर्नर टेट रीव्हज यांनी म्हटले आहे.









