नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इथेनॉल आणि पेट्रोल यांचे मिश्र इंधन उपयोगात आणू शकतील अशी इंजिने बनविण्यात यावीत असा आदेश देशातील कार उत्पादकांना देण्यात येणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा मंगळवारी केली. भारताला दरवर्षी <8 लाख कोटी रुपयांचे कच्चे इंधन तेल आयात करावे लागते. येत्या पाच वर्षांमध्ये ही आयात 25 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. ती कमी करायची असेल तर देशांतर्गत इथेनॉल उत्पादनाला चालना देणे आवश्यक असून कार्सची इंजिनेही त्याप्रमाणे बनविण्यात यावी लागतील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.









