राजपाल यादव मुख्य भूमिकेत
टीव्ही अभिनेत्री रश्मि देसाई पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर दिसून येणार आहे. दिग्दर्शक अनूप थापा यांच्या ‘मिशन लैला’ या चित्रपटात रश्मि मुख्य भूमिका साकारत आहे. रश्मिने या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. ‘मिशन लैला’मध्ये तिच्यासोबत राजपाल यादव, भाविन भानुशाली, वीरज राव, अतुल श्रीवास्तव, प्रदीप काबरा, सुनील पाल आणि गौरव शर्मा हे कलाकार दिसून येणार आहेत.

मिशन लैला हा एक विनोदी धाटणीचा चित्रपट आहे. सोशल मीडियावर मिशन लैला चित्रपटाच्या शूटिंग रॅपची काही छायाचित्रे शेअर करण्यात आली आहे. या छायाचित्रांमध्ये रश्मि अन् राजपाल हे चित्रपटाच्या अन्य कलाकारांसोबत दिसून येत आहेत.
दिग्दर्शक अनूप थापांच्या या चित्रपटात राजपाल अन् रश्मि मुख्य भूमिका साकारत आहेत. मनीष मिश्रा यांच्याकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाची कहाणी नीरव सोनी आणि निमित वोरा यांची आहे. अनेक दिवसांपासून चांगला विनोदी चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळालेला नाही. याचमुळे आम्ही प्रेक्षकांना विनोदात काही नाविन्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी खात्री आहे. हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक थापा यांनी म्हटले आहे.









