ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या मजबूतीसाठीचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ई कॉमर्स क्षेत्रात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अर्बन लॅडर आणि मिल्कबास्केट या कंपन्यांची खरेदी करण्याचे संकेत आहेत. अर्बन लॅडर ऑनलाईन फर्निचर विक्रीचा व्यवसाय करते तर मिल्कबास्केटचा क्यवसाय दूधाची डिलीवरी करण्याचा आहे. या दोन्ही कंपन्यांसोबत रिलायन्सची चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
अर्बन लॅडरची खरेदी करण्यासंदर्भात मागील काही महिन्यापासून चर्चा सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. सदरचा व्यवहार हा 30 दशलक्ष डॉलरपर्यंत होण्याची माहिती देण्यात आलीय. यासोबतच ऍमेझॉन आणि बिगबास्केटसोबत व्यवहार झाल्यानंतर मिल्कबास्केट तसेच रिलायन्स खूप जवळ आल्याचे पहावयास मिळाले आहे. व्यवहार पूर्ण झाल्यास कंपनीला अधिक प्रगती साधता येणार आहे.
मिल्कबास्केटला 5 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक मिळाल्यानंतर मजबुती प्राप्त झाली आहे. कारण मिल्कबास्केट ही 1.30 लाख घरांमध्ये आपली सेवा देत आहे आणि यामध्ये भाजी, डेअरी, बेकरी आणि अन्य एफएमसीजीसंबंधीत जोडलेली 9 हजार उत्पादनांची डिलिव्हरी करत आहे. यामुळे या प्लॅटफॉर्मचा रिलायन्सला ई कॉमर्ससाठी मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.









