डिचोली / प्रतिनिधी
मये मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मिलींद पिळगावकर यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला पिळगावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा देवीचरणी श्रीफळ अर्पण करून प्रारंभ केला. यावेळी त्यांच्या समवेत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मये मतदारसंघात मतदारांसाठी एक वेगळा पर्याय म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरणार असून आतापर्यंत मतदारसंघात केलेला प्रचार व कोपरा बैठकांद्वारे लोकांकडून चांगला प्रतिसाद लाभलेला असून मये मतदारसंघात यावेळी बदल घडणार आहे. असा विश्वास मिलींद पिळगावकर यांनी व्यक्त केला. यावेळी पिळगावकर यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार संघातील मतदार उपस्थित होते.









