ऑनलाईन टीम / मुंबई :
सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन बांधकाम केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा मुरूड मधील बंगला तोडण्याचे काम सुरू आहे. मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर नार्वेकर यांचा हा बंगला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नार्वेकरांसह अन्य काही लोकांनी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करुन बंगल्याचे बांधकाम केल्याची तक्रार केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. त्या तक्रारीनंतर पर्यावरण विभागाने मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडण्याचे काम सुरू केले आहे. किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. बंगला पाडण्याचे काम सुरू झाल्यानंतर सोमय्या यांनी ट्विट करुन हा
‘करून दाखविले! मिलींद नार्वेकरांचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा….उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार.’ असे ट्विट केले आहे.









